औरंगाबाद : जम्मू येथे झालेला ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील विमानतळावर आता हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जर ड्रोनमध्ये उडताना दिसली तर प्रथम त्याला उतरण्याचा इशारा द्यावा. ड्रोन ते आदेश पाळत नसेल तर त्याला शुट करण्याचे आदेश केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव व्हिजीटर्सना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीर येथील ड्रोन हल्ल्यानंतर देशभरातील सर्व विमानतळांवर आता हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश आहे. नियमानुसार विमानतळाच्या तीन किलोमीटर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आहे. असे असतानाही एखादे ड्रोन या परिसरात आल्यास त्याला प्रथम सुरक्षितपणे खाली उतरण्याचा इशारा दिला जातो. त्याचे पालन न केल्यास त्या ड्रोन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत.
तसेच इशारा देऊनही जर विमानतळ परिसरात घिरट्या घालत असेल किंवा विमानतळावर विमान थांबलेली असून ड्रोन त्या कडे धाव घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याक्षणी शूट करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या आदेशानंतर विमानतळाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून व्हिजीटर्सना प्रवेश बंद करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर १८ जून पासून रस्ता विमानतळावर प्रवेश पूर्ववत करण्यात आला होता. त्याच दरम्यान जम्मू येथे ड्रोन हल्ला झाल्याने ही सेवाही तात्काळ बंद करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सामान्यांना लोकलप्रवासाची मुभा द्या नाहीतर पाच हजार प्रवास भत्ता द्या’; भाजपची मागणी
- मनगढत कहाण्या बनविण्याचं काम सुरू, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – नाना पटोले
- हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार, भाजप आमदाराचा आरोप
- ‘नाना पटोलेंची भूमिका सरकारला सुरुंग लावणारी’ ; अजितदादांचा आक्रमक पवित्रा
- ‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं, त्यांच्या प्रमुखांनीच पाळत ठेवली हे किती वाईट!’; भाजप नेत्याची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

