Share

ठाकरेंनी लोकार्पण केलेल्या हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम पुन्हा बंद

Published On: 

औरंगाबाद : मागे काही दिवसांपूर्वी सुरू झालेले हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा बंद पडले आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने महसूल विभागाकडे दीड हेक्टर जागेची मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जागा देण्यासंदर्भात आदेशही दिले. मात्र आजवर पालिकेला जागा मिळालेली नाही. त्यामुळे जागेअभावी हा प्रकल्प बंद अवस्थेत पडून आहे.

मागील अडीच वर्षांत चिकलठाणा येथील १५० मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प वर्षभरापूर्वीच सुरू झाला. मात्र पडेगाव, कांचनवाडी, हर्सूल या प्रकल्पांची कामे या ना त्या कारणाने रेंगाळतच राहिली. यापैकी आता पडेगावचा १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प आणि कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या तिन्ही प्रकल्पांचे लोकार्पण झाले होते.

चार कचरा प्रक्रिया प्रकल्पांपैकी एक असलेला हर्सूल येथील १५९ मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेवर काही खासगी नागरिकांनी मालकीचा दावा केला आहे. त्यामुळे पालिकेने तालुका भूमिअभिलेख विभागाकडून जागेची मोजणी करून घेत पालिकेच्या नियोजित जागेवर अर्धवटरित्या प्रकल्प उभारला आहे. मात्र प्रकल्पाचे पुढील काम पूर्ण करण्यासाठी पालिकेला आणखी दीड हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासंदर्भात पालिकेने महसूल विभागाकडे प्रकल्पाला लागून असलेली जागा मागितली आहे. महसूल विभागाकडून यासंदर्भात कोणतीही कारवाई आजवर झालेली नाही. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा आढावा घेताना जागा देण्याचे आदेश दिले होते.

मजूर सहा महिन्यांपासून थांबलेले : हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे सिव्हील वर्कचे काम करण्यासाठी घेतलेल्या कंत्राटदाराचे मजूर मागील सहा महिन्यांपासून या जागेवर अर्धवट काम झालेले असल्यामुळे थांबलेले आहेत. त्यामुळे कंत्राटदारस कामगारांना बसून पगार द्यावा लागत आहे. कंत्राटदार काम सोडून देण्याच्या मनस्थितीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!