Share

“भारताच्या वीर मुला तुझा अभिमान वाटतो; काल तुला तुझ्या वडिलांच्या कबरीजवळ पाहून मन सून्न झालं”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलियावर शानदार कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज भारतात परतली. या दौऱ्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. या दौऱ्याचा शेवट ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने गोड केला. विशेष या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे.

या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे. ब्रिस्बेन येथे भारताने मिळवलेल्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने महत्वाची भूमिका बजावली.

या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा सिराज मायदेशात परताच एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचे २० नोव्हेंबरला निधन झाले. त्याच्या एक आठवड्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला होता आणि कोरोना नियमांमुळे सिराजला वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी मायदेशात परतता आले नाही. या दौऱ्यामध्ये कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा मोहम्मद सिराज मायदेशी परतल्यावर एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि त्याने तिथे वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सिराजचा हा फोटो पाहून धमेंद्र भावुक झाले. त्यांनी लिहिले की,”भारताच्या वीर मुला तुझा अभिमान वाटतो. वडिलांच्या निधनाचे दुःख हृदयात ठेवून तू भारतासाठी मॅच खेळलास आणि एक अविश्वसनीय विजय देशाला मिळवून दिला. काल तुला तुझ्या वडिलांच्या कबरीजवळ पाहून मन सून्न झालं. त्यांना स्वर्गात जागा मिळेल.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!