Share

वाढत्या वयामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतायत; मग आजपासूनच सुरु हा उपाय

Published On: 

🕒 1 min read

पुणे : वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये बरेच बदल घडतात. कारण ही प्रक्रिया नैसर्गिक असते. वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या देखील वाढतात. त्यासाठीच आरोग्याची कशी निगा राखावी याची माहिती पुढीलप्रमाणे :

1.आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा.

2.विशेषतः हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. याव्यतिरिक्त शरीरातील रक्तशर्करा देखील नियंत्रण राहण्यास मदत मिळते.

3.शारीरिक समस्या उद्भवू नये, वजन वाढू नये; यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी चालणे, योगासनांचा सराव, धावणे, जॉगिंग, मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणं फायदेशीर ठरू शकते.

4.अपुऱ्या झोपेमुळेही वजन वाढू शकते. आरोग्य निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप मिळणं देखील आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे चयापचयाच्या क्षमतेवर दुष्परिणाम होतात.

5.शारीरिक आणि मानसिक तणावापासून शक्य होईल तेवढे स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

6.पौष्टिक आहाराचे सेवन आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला स्वतःमध्ये बरेच सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.

7.हल्ली वेगवेगळ्या कारणांमुळे बहुतांश जण मानसिक तणावाचा सामना करत आहेत. यामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात. भविष्यात गंभीर आजारांचा सामना करावयाचा नसल्यास वेळीच आरोग्याची योग्य देखभाल करण्यास सुरुवात करा.

व्हिटॅमिन सी-यु्रत फळे : शरिरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अँटी ऑक्सिडेंटयुक्त फळ आणि भाज्यांचे सेवन करायला हवे. यासाठी संत्री, चेरी, लिची, लिंबू याचा आहारात नियमित समावेश करायला हवा. व्हिटॅमिन सी हे शरीरात रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी मदत करते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!