Share

पुढच्या २४ तासांत कोकणात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Published On: 

मुंबई :  राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत प्रचंड पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे. मात्र येत्या २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे  हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. तसेच पोलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड कोसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही गावातील 13 जखमींना महाड आणि पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकंदरीत अशी परिस्थिती असताना हवामान विभागाकडून पुढील २४ तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर पुढचे २ ते ३ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्यासोबतच कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे. उद्या (२४ जुलै रोजी) देखील हे प्रमाण कायम राहणार असून त्यानंतर ते कमी होऊ शकते. तर कर्नाटकमध्ये किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटकमध्ये आज दिवसभर अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!