🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : दरवर्षीच्या प्रमाणात यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकरी सुखावला होता. पण अशात आता शेतातील कामे चालू असताना काही भागात परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आज राज्यात विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात परतीच्या पावसाची हजेरी
सध्या राज्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोयाबीन काढणी सुरू होत असताना परतीच्या पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली आहे. काल दसऱ्याच्या सणात देखील पावसामुळे अनेक ठिकाणी अडचणी आल्या. सिमोल्लंघन करायला घराबाहेर पडणाऱ्यांना देखील पावसाने चांगलेच झोडपल्याचे पाहायला मिळाले .
नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात दोन दिवस पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. तोंडाशी आलेली पिकं वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानूसार येत्या चार दिवसात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. परभणी, हिंगोली, नांदेड या भागात पाऊस आणखीन कोसळण्याची शक्यता आहे.
परिणामी, शेतकऱ्यांनी आपली कामे पावसाच्या अंदाजाने करणे देखल गरजेचे आहे. परतीचा पाऊस असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होण्याची शक्यता अधिक असते.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता
आज राज्यात विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून कालपासून राज्यातील अनेक ठिकाणी परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याने राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम भागातील काही भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Explained | तर शिंदे गटाचे ४० आमदार निवडून येणे कठीण, अस्तित्वाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंनी जिंकला
- Top Ten Cars | आपल्या स्पीडने सगळ्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या ‘या’ आहेत जगातील टॉप टेन स्पीडी कार
- Rahul Gandhi | राहुल गांधींचे मातृप्रेम! आईला पायी चालतांना पाहून केले असे काही की…
- Adipurush । “आदिपुरुष चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”; भाजपची आक्रमक भूमिका
- Viral Video | खड्ड्यात अडकलेल्या हत्तीला काढले बाहेर, बाहेर येताच हत्तीने मानले आभार! पाहा व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
