Share

ऱ्हदयद्रावक! वैजापूरमध्ये नराधम सावत्र बापाकडून मुलीवर अमानुष अत्याचार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :अल्पवयीन १४ वर्षीय मुलीचा गेल्या वर्षभरापासून सावत्र बापासह अन्य एकजण लैंगिक छळ करीत असल्याची खळबळजनक घटना वैजापूर शहरातील मोंढा मार्केट परिसरात उघडकीस आली. विशेष म्हणजे हे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही तर दस्तूरखुद्द बापानेच मुलीच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून सर्व सीमा पार केली. हे घृणास्पद कृत्य करण्यासाठी सख्या आईचीही सहमती होती. याप्रकरणी सावत्र बापासह आई व अन्य एकजण अशा तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील पीडित अल्पवयीन १४ वर्षीय मुलगी ही औरंगाबाद येथील एका वसतीगृहात शिक्षण घेत होती. परंतु तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ती शहरातील मोंढा मार्केट परिसरातील तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. त्यामुळे ती गेल्या वर्षभरापासून येथे वास्तव्यास होती. परंतु तिच्या सावत्र बापाची तिच्यावर वाईट नजर होती. तो तिच्यासोबत अश्लील चाळे करीत असत. एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा एकजणही तिचा लैंगिक छळ करीत होता. तिने धाडस करून ही आपबीती आईला सांगितली. परंतु  तिने मुलीची साथ न देता शेजारील अत्याचार करणारा जसे सांगतो तसे कर, असे सांगून पीडित मुलीलाच मारहाण केली.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर बापाने- नीचतेच्या सर्व सीमा पार केल्या. गेल्या आठवड्यात २४ ऑक्टोबर रोजी बापानेच तिच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून क्रौर्याची सीमा गाठली. तिला त्रास होऊ लागल्याने ती शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील तिच्या मावशीकडे पळून गेली. ती मावशीकडे गेल्यानंतरही त्यांचा शेजारी तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. त्याने दुसऱ्यांना दुचाकी घेऊन तिला आणण्यासाठी वारंवार मावशीकडे पाठविले. परंतु तिच्या मावशीने त्यांना पिटाळून लावले. परंतु त्याची दादागिरी थांबायला तयार नसल्यामुळे पीडितेसह तिच्या मावशीने १ नोव्हेंबर रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

हा घृणास्पद प्रकार ऐकून पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र बापासह आई व अन्य एकजण अशा तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास औरंगाबाद येथील सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत. त्या नराधाम बापासह आई या दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. वैजापूर पोलीस त्याचा शोध घेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!