सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या शर्यतींमध्ये धावतच असतो. म्हणजेच प्रत्येकजण आपले गोल्स मिळवण्यासाठी त्या गोष्टीच्या मागे लागलेले असतात. परंतू यासगळ्याचा परिणाम आपल्या शरीरिक आणि मानसिक स्वास्थावर होत आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये हृदय विकार चे प्रमाण जास्त असल्याचं दिसून येते. ज्या लोकांना हृदयाचे विकार असतात, त्यातील बरेचसेजण आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग करत असतात. तर आज आम्ही तुम्हाला म्हणजेच हृदय विकारांच्या लोकांनी कोणती आसने करू नयेत, हे सांगणार आहोत.
1. हालासन – हलासनामध्ये पाठीवर झोपणे, पाय वरून डोक्यावर आणणे आणि जमिनीला स्पर्श करणे. पोट आणि थायरॉइडच्या समस्या कमी करण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. परंतु जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर हे आसन करू नका. यामुळे पोटासोबतच हृदयावरही दबाव येतो. आणि हा दबाव तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
2. सर्वांगासन- हृदयरोग्यांनीही सर्वांगासनाचा सराव करू नये. कारण हे आसन करताना डोके खाली आणि पाय वर राहतात. ज्यामुळे तुमच्या हृदयाला रक्ताभिसरणासाठी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावे लागते. त्यामुळे हृदयावर खूप दबाव येतो.
3. चक्रासन – चक्रासनाला व्हील पोज असेही म्हणतात. चक्रासनाच्या सरावाने मणक्याची लवचिकता वाढते. यासोबतच हे आसन मधुमेह आणि श्वसनाच्या आजारावरही फायदेशीर आहे. पण जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल तर हे आसन पूर्णपणे टाळा कारण त्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो. ज्यामुळे समस्या वाढू शकतात.
4. शीर्षासन – हे आसन करताना डोके खाली आणि पाय वर राहतात. ज्यामुळे तुमच्या हृदयाला रक्ताभिसरणासाठी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावे लागते. त्यामुळे हृदयावर खूप दबाव येतो.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर ती परिस्थिती कशी हाताळावी, जाणून घ्या!
- Chandrakant Khaire | “मी आता मैदानात उतरलोय, काय होईल…” चंद्रकांत खैरेंचा संदिपान भुमरे यांना इशारा
- Car Update | ‘या’ कार मध्ये आहेत सर्वोत्तम सनरुफ फिचर
- Shahajibapu Patil | “पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा…”, शहाजीबापू पाटलांचा इशारा
- Amit Shah | “अमित शहा सत्तेतील प्रभावशाली नेत्यांपैकी एक..” राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य


