मुंबई : सध्या फक्त ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास परवानगी असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लसीकरण करून घेतले आहे. वयोवर्षे ४५ च्या आतील असतानाही तन्मय फडणवीस याने लसीकरण केल्याच्या फोटोची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे.
त्याने तो फोटो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. या सर्व प्रकरणामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी फडणवीसांवर टीका केली. परंतु आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस असणाऱ्या शालिनी ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबतच स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ट्वीट करून याबाबतचे उत्तर आरोग्यमंत्री यांना मागितले राजेश टोपे आहे.
‘आरोग्यमंत्री राजेश टोपे उत्तर द्या? तन्मय फडणवीस हे नक्की कोण? फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी की 45 वर्षावरील व्यक्ती? मग त्यांना कोरोना लस दिलीच कशी? #तुमचाखेळहोतोआमचाजीवजातो’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना धारेवर धरले आहे. यावर आता आरोग्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे उत्तर द्या..???
तन्मय फडणवीस हे नक्की कोण..? फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी की 45 वर्षावरील व्यक्ती..? मग त्यांना कोरोना लस दिलीच कशी..? #तुमचाखेळहोतोआमचाजीवजातो— Shalini Thackeray (@ThakareShalini) April 20, 2021
देवेंद्र फडणवीसांच स्पष्टीकरण –
‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने मी माझ्या पत्नीला व मुलीलाही लस दिलेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलच पाहिजे असं माझं ठाम मत आहे,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- सिंघम अजय देवगनची लेक ‘न्यासा’ झाली १८ वर्षाची; अजयने दिल्या खास शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

