🕒 1 min read
मुंबई : फ्लाईंग सिख म्हणून ओळख असलेले दिग्गज धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले होते. पण मात्र अखेर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची हार झाली. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करुन मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विट मध्ये बिग बी म्हणाले, ‘मिल्खा सिंग यांचे निधन झाले हे ऐकुन दु:ख झाले. ते भारताचा अभिमान होते. एक उत्कृष्ट क्रिडापटू होते आणि एक चांगले माणुसही होते. वाहेगुरु दी मेहर.. प्रार्थना’ अशा शब्दात बिग बी यांनी भावना व्यक्त केल्या. बिग बी व्यतिरीक्त मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारीत ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात त्यांची भूमिका साकारणारा फरहान अख्तरनेही मिल्खा सिंग यांना श्रद्धाजंली अर्पण केली आहे.
T 3940 – In grief .. Milkha Singh passes away .. the pride of India .. a great athlete .. a greater human ..
Waheguru di Mehr .. prayers ????????— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 19, 2021
मिल्खा सिंग यांनी तब्बल चार वेळा आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. १९६० साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धेत त्यांनी ४०० मीटर शर्यत ४५.६ सेकंदात पूर्ण केली होती. यापुर्वी १९५६ मध्ये आशियाई स्पर्धेत २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. भारत सरकारने त्यांना २००७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले होते. पाच दिवसापुर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर मिल्खा सिंह यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंची भाजप नेत्यांवर कारवाई, प्राधिकरणाचे सदस्य होण्यास ठरवले अपात्र
- “स्वबळाची भाषा राष्ट्रवादी करत नाही”, टोंपेंचे ‘स्वबळावर’ स्पष्टीकरण
- पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
