Share

लखीमपुरमधील आंदोलकांना गाडीखाली चिरडणारा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खीरी येथे रविवारी शेतकऱ्यांसह ९ जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षासह सर्वांनी आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने हा पराक्रम केला असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सोमवारी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामध्ये एक गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसते आणि त्यांना तशीच चिरडत पुढे निघून जाते असे दिसत आहे. या गाडीमध्ये मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच बसला होता असे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. परंतु त्याअगोदरच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!