औरंंगाबाद : नरभक्षक बबला गँगचा सदस्य असलेल्या शेख मजीद उर्फ मुर्गी शेख अली (वय २८, रा.खडकेश्वर परिसर) याचा खून करून मृतदेह बारापुल्ला नाल्या जवळ टाकून दिल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली होती. या घटनेनंतर छावणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह तिघांना रविवारी (दि.३०) पहाटे ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या तिघांनी शेख माजीद उर्फ मुर्गी याने गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केल्यामुळे त्याचा खून केला असल्याची कबूली पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख परवेज शेख समद (वय २१) फळविक्रेता, रा. कोतवालपुरा बारापुल्ला गेट, अरबाजखान वाईजखान (वय २१) अशी पोलिसांनी अटक केलेल्या मारेक-यांची नावे आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेख माजीद उर्फ मुर्गी चे मारेकरी मोबाईलवर पबजी खेळत होते. त्यावेळी शेख शेख माजीद याने त्यांना अडवून त्यांच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी कली होती, तसेच पैसे न दिल्यास जीवे मारून टाकू असे धमकावले होते.
त्यामुळे शेख परवेज, अरबाज खान या दोघांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने शेख माजीद उर्फ मुर्गी याला पैसे देतो तिकडे चल असे म्हणत बारापुल्ला गेटजवळ आणले. शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास तिघांनी शेख माजीद याच्या अंगातील कपडे काढुन घेत त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान जखमी झालेला शेख माजीद हा खाली कोसळल्यावर शेख परवेज व अरबाज खान यांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली होती. या घटनेमुळे घाबरलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने याची माहिती त्याच्या निकटवर्तीयाला सांगितली होती, त्यामुळेच या खूनाचा वाचा फूटली असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाही, त्यात तिसरी लाट आली तर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

