अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगरच्या सावेडी बसस्थानक परिसरात किराणा दुकानामध्ये गुटखा घेण्याच्या बहाण्याने आलेल्या अनोळखी व्यक्तीने दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली सोन्याची साखळी चोरून पोबारा केला. या प्रकरणी काल (बुधवार दि.४) रोजी रात्री अकराच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली दिलीप आव्हाड यांचे सावेडी बसस्थानकाच्या पाठीमागे किराणा दुकान आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास त्या दुकानात होत्या. यावेळी त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी केसामध्ये अडकत असल्यामुळे ती गळ्यातून काढून दुकानाच्या काउंटरवर ठेवली.
याचवेळी दुकानामध्ये एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने आव्हाड यांना ‘गुटखा आहे का’, असे विचारले. दुकानात गुटखा नसल्यामुळे संबंधित व्यक्तीने पाच रुपयांची शॅम्पूची पुडी घेतली आणि त्याबद्दल्यात त्याने दहा रुपये आव्हाड यांना दिले. उर्वरीत पाच रुपये परत घेत असतानाच संबंधित व्यक्तीने आव्हाड यांची नजर चुकवून काऊंटरवर ठेवलेली सोन्याची साखळी चोरली आणि तो तेथून पसार झाला.
सोन्याची साखळी चोरीला गेल्याचे लक्षात येताच आव्हाड यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी सोनसाखळी चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल गाजरे पुढील तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- …तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही ; नवनीत राणांचा आक्रमक इशारा
- भाजपच्या संकटमोचक महाजनांना खडसेंचा मोठा झटका !
- मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचं काही नेत्यांचं षडयंत्र; ओबीसी समाज आक्रमक


