Share

‘तुम्ही सेक्युलर झाला आहात का?’ राज्यपालांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बार देखील सुरु करण्यात आले आहेत.

येत्या काही दिवसात सिनेमागृहे देखील सुरु करण्यात येतील मात्र राज्य सरकारने मंदिर खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.

राज्यपालांचं पात्र-

प्रिय उद्धव ठाकरे,

जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशई संवाद साधताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु या सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत.

11 ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय न पुढाऱ्यांचाही समावेश होता.

तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे.

मी इथे नमूद करु इच्छितो की दिल्लीत 8 जून रोजी प्रार्थनास्थळे सुरु करण्यात आली आहेत तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशात अनेक ठिकाणी मंदिरं सुरु करण्यात आली होती. मंदिरं सुरु झाल्यानंतर तिथे कोविडचा प्रसार झाल्याचे आढळून आलेलं नाही. मी विनंती करतो की कोविड संसर्गाची योग्य ती काळजी घेऊन राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावीत. या पत्रासोबत मंदिरे सुरु करम्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत प्राप्त झालेली तीन प्रेझेन्टेशनही जोडत आहे.

राज्यपाल

भगतसिंह कोश्यारी

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!