परळी : मराठवाड्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या भागामध्ये तुफान पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. त्यामुळे आता पुढे काय? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी संतप्त भूमिका घेत काही सवाल राज्यकर्त्यांना केले आहेत. सध्याची परिस्थितीमध्ये राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे. केंद्र सरकारनेत किती मदत करायची, राज्य सरकराने किती मदत करायची, म्हणजे महाराष्ट्राची जनता आता महाराष्ट्राची जनता अनाथ झाली का काय? त्यांचे कोणीच वाली नाही का? प्रत्येक जण एकमेकांवर आरोप करत आहेत. एकमेकांवर आरोप करुन विषय टाळणे हे सरकारचे काम नाही जनतेच्या पाठीशी उभं राहणे हे सरकारचे काम असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
तसेच यावर बोलताना त्या म्हणल्या कि, ‘मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हि सर्व परिस्थिती भीषण आहे, अनेक गावांत पाणी शिरलं आहे. शेत वाहून गेलं आहे. जमीनी खराब झाल्या आहेत. पीकाचे नुकसान, शेतजमीन दुरुस्त करण्यासाठी मदत, गावांचे नुकसान झालं आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी.’ अशी मागणी देखील यावेळी पंकज मुंडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आलिया भट्टच्या ‘कन्यादान’ जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

