Share

हार्दिक करतोय अगस्त्य सोबत मजा; अगस्त्य सोबत फेरफटका मारतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Published On: 

मुंबई : भारतीय टीमचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या काही दिवसांपूर्वीच वडील झाला आहे. हार्दिक पंड्याने फोटो पोस्ट करुन  बाबा झालो असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता हार्दिकने नुकताच एक फोटो इंस्टग्रामवर शेअर केला होता. या फोटोला त्याने From national duty to father duty ❤️ असं कॅप्शनही दिल होते.

या फोटो नंतर नुकतेच नताशाने इंस्टाग्राम स्टोरीवर नवरा हार्दिक पांड्या आणि मुलगा अगस्त्यचा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक त्याचा मुलगा अगस्त्यला बाहेर फिरवताना दिसतो आहे.हार्दिक पांड्या आणि त्याचा मुलगा अगस्त्यचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओत अगस्त्य बेबी स्ट्रोलरमध्ये बसलेला दिसतो आहे आणि त्याला वडील म्हणजेच हार्दिक पांड्या फिरवताना दिसतो आहे.हार्दिक पांड्याने १ जानेवारी २०२० रोजी नताशासह साखरपुडा केला होता. कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना हार्दिक आणि नताशाने देशवासियांना आपल्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी दिली होती.

दरम्यान’ ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील कामगिरीचे अष्टपैलू हार्दिक पंड्याचे  सर्वत्रच कौतुक होत आहे. पंड्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सिक्‍सरकिंग युवराज सिंग यांचे एकत्रीकरण आहे, असे वक्तव्य माजी कसोटीपटू गौतम गंभीरने केले आहे. पंड्याच्या या खेळीचे कौतुक देखील केले आहे.

https://www.instagram.com/p/CI56GM_Hx2y/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!