Share

चंद्रकांतदादा तुम्हाला हिमालयात जाण्याची गरज नाही, मुश्रीफांचा पाटलांना टोला

Published On: 

पुणे : कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असं खुलं आव्हान देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शड्डू ठोकला आहे.

मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?, असं कळवल्याचं देखील सांगितलं.

मात्र, यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ‘चंद्रकांतदादांना हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला इथेच त्यांची गरज आहे,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलेलीच नाही,’ असं ते म्हणाले. ‘विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेलं आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळं चंद्रकांतदादांसाठी राजीनामा कोण देणार? कशासाठी? हे होणार नाही, हे दादांनाही माहीत आहे. त्यामुळंच ते हिमालयात जाण्याची भाषा करत आहेत,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

‘ज्या कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांतदादा निवडून आले आहेत, ती जागा सोडण्याची परवानगी भाजप कशी देईल? दोन्हीही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळं पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुमची इथेच गरज आहे,’ असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!