Share

‘शरद पवारांच्या बदनामीची सुपारी फडणवीसांनी पडळकरांना दिलीये’

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या वर्षीपासून चांगलेच चर्चेत असतात. पवार कुटुंबियांसह महाविकास आघाडीवर सातत्याने केलेली बोचरी टीका, आंदोलने यामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने जहरी टीका करत आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी देखील आज गोपीचंद पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. गोपीचंद पडळकर यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची फूस असल्याचा आरोप करताना त्यांना आवरा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशा इशारा मुश्रीफ यांनी दिलाय. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘शरद पवार यांना बदनाम करण्याची सुपारीच आमदार पडळकरांना देण्यात आली आहे. त्यांचा बोलविता धनी माजी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांचीच पडळकरांना फूस आहे. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा डाव खपवून घेतला जाणार नाही,’ असं हसन मुश्रीफ म्हणाले.

पडळकरांची पवारांवर टीका –

‘शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. त्यांना ‘भावी पंतप्रधान’ म्हणलं जात पण त्यांचा पक्ष हा साडेतीन जिल्ह्यांपुरता आणि तीन खासदारांचा आहे. पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ असा घणाघात पडळकरांनी केला होता. तसंच, ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही.’ असं देखील पडळकर सोलापुरात भाष्य केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!