मुंबई- माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. गेली काही वर्ष पक्षातलं महत्व कमी झाल्यानं नाराज असलेले खडसे पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत्या. अखेर काल भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसेंनी आपली भूमिका मांडली. गेली 40 वर्ष मी भाजपाचं काम केलं. पक्षानंही मला बरंच काही दिलं. पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही. उलट भाजपा सोडताना खंत आहे. मला देवेंद्र फडणवीसांनी छळलं. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं ते म्हणाले.
माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. स्नुषा रक्षा खडसेही भाजपा सोडणार नाहीत, असं खडसे यांनी स्पष्ट केलं. खडसे उद्या, शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीमुळे काल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान,प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपसाठी काम केले होते. त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
दरम्यान,या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील एक मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.’एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असे नमूद करत मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली. आगामी काळात भाजपमध्ये गेलेले तसेच काठावरचे अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊ करणार दसऱ्याच्या आधीच सीमोल्लंघन , राष्ट्रवादीचा आनंद गगनात मावेना
- लॉकडाऊन मध्ये पोस्ट ऑफिस सेवा वापरण्याचा कल वाढला
- नाथाभाऊ जाऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, ‘त्यांना शुभेच्छा’ : केशव उपाध्ये
- जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारताला वगळलं
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

