नवी दिल्ली- अराजपत्रित केंद्रिय कर्मचाऱ्यांना 2019 -20 या वर्षासाठी बोनस देण्याला मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रीमंडळाच्या कालच्या निर्णयांची माहिती बैठकीनंतर पत्रकारांना दिली, त्यावेळी ते बोलत होते. याचा लाभ 30 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. हा बोनस दसऱ्यापूर्वी एकाच वेळेत दिला जाईल, असं जावडेकर यांनी सांगितलं.
या घोषणेनंतर सरकारी तिजोरीवर ३,७३७ कोटी रुपयांचा भार वाढणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही बोनसची रक्कम सिंगल इन्स्टॉलमेंटमध्ये जारी केली जाईल असे म्हटले आहे. ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे विजयादशमीच्या पूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जारी केली जाणार आहे.
रेल्वे, टपाल खाते, संरक्षण, कर्मचारी निवृत्तीवेतन संघटना (ईपीएफओ) आदी व्यावसायिक विभागांमधील १६.९७ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल. त्यासाठी २,७९१ कोटी रुपये खर्च होतील. तसेच बिगरराजपत्रित १३.७० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ होणार आहे. एकूण ३०.६७ लाख कर्मचाऱ्यांना ३,७३७ कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊ करणार दसऱ्याच्या आधीच सीमोल्लंघन , राष्ट्रवादीचा आनंद गगनात मावेना
- लॉकडाऊन मध्ये पोस्ट ऑफिस सेवा वापरण्याचा कल वाढला
- नाथाभाऊ जाऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, ‘त्यांना शुभेच्छा’ : केशव उपाध्ये
- जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारताला वगळलं
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

