मुंबई : गेले साडेसहा महिने कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याकाळात सामान्य नागरिकांपासून ते केंद्रीय मंत्र्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. राज्यात देखील अनेक मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे क्वारंटाईन झाले आहेत.
कोरोना काळात देखील अगदी भल्या पहाटेपासून पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी अजितदादांनी ठिकठिकाणी धडक देत कामाची पाहणी केली होती. त्यामुळे स्पष्ट वक्त असलेल्या अजित पवारांना धडाकेबाज निर्णय घेणारा नेता म्हणून ओळखलं जातं. याकाळात त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच ते भेट घेत असल्याचं दिसून आलं.
सोशल डिस्टंसिंग किंवा मास्क योग्य पद्धतीने न घातलेल्या अधिकाऱ्यासह एका पक्षाच्या नेत्याला देखील त्यांनी झापलं होतं. आता अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र,कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे. पण थोडी ताप थंडी सारखी लक्षणे असल्याने अजित पवार यांनी सार्वाजनिक कार्यक्रम थांबाविले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊ करणार दसऱ्याच्या आधीच सीमोल्लंघन , राष्ट्रवादीचा आनंद गगनात मावेना
- लॉकडाऊन मध्ये पोस्ट ऑफिस सेवा वापरण्याचा कल वाढला
- नाथाभाऊ जाऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, ‘त्यांना शुभेच्छा’ : केशव उपाध्ये
- जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारताला वगळलं
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

