कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वरदान ठरत आहे. पण इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने यावरून राज्यात चांगलाच वाद झाला होता. रेमडेसिवीरच्या साठ्यावरून भाजपवर टीका होत असतानाच अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी मात्र आपल्या जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या रेमडेसिवीर आणले आहेत. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबूकवर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी शिर्डी विमानतळावर दिल्लीहून ही इंजेक्शन्स आणली होती. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी संस्थान, प्रवरा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयास ती मोफत देण्यात आली. दरम्यान, रेमडेसिवीरचा साठा आला कोठून ? व त्यांना कसा मिळाला ? यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विखेंना लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, डॉ. सुजय विखे यांच्यावर योग्य कारवाई केली जावी अशी मागणी करणारी याचिका नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ही फौजदारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २९ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत संबंधित यंत्रणा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे यासंबंधी कारवाई करू शकतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
त्यांनतर आता राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील सुजय विखेंना चांगलच फैलावर घेतले आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र घेतलं. रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी त्यांनी पत्र मिळवलं. हिमाचल प्रदेशमधून त्यांनी २ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळवले. केंद्र सरकारचं नियंत्रण असताना हे इंजेक्शन त्यांना कसे मिळाले? त्यांनी प्रशासनाला ते द्यायला हवे होते. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्याचं वाटप कसं केलं? त्या रेमडेसिविरची शुद्धता तपासली गेली का? अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. २९ एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे”, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- दौलताबाद अपघात प्रकरणी दोन दिवसानंतर कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल
- आ.शिरसाटसह ४० जणांवर गुन्हे, संचारबंदीचे उल्लंघन करत उद्घाटन
- ‘सोनिया गांधी मोफत लसीकरण करा म्हणतायत, पण काँग्रेसचे मंत्रीच सत्ता लालसेमुळे नांग्या टाकून बसलेत’
- जमत नसेल तर सांगा आम्ही सर्व केंद्र सरकारकडे सोपवतो, हायकोर्टाने केजरीवालांना झापलं
- विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी, आज निघाले ‘एवढे’ कोरोना स्प्रेडर!


