🕒 1 min read
मुंबई : १५ ऑगस्ट २०१९ मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर इंडियन टीमचा कूल कॅप्टन आता सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. मध्यंतरी धोनीचे शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे धोनीची टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरली आहे. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या आहेत.
तसेच मत्सोद्योगात, बदक पालन आणि पोल्ट्री फार्ममध्ये देखील धोनीने गुंतवणूक केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता महेंद्रसिंह धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करेल. धोनीने मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या २ हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डरही दिली आहे.
झाबुआ जिल्ह्यातील थांदला खेड्यातील रहिवासी शेतकरी विनोद मेधा, रांचीतील धोनीच्या टीमला २००० कडकनाथ पिल्लांची पुरवठा करण्याची १५ डिसेंबरची मुदत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. विनोद यांना आशा आहे की, जेव्हा ते रांची येथे कडकनाथ पिल्लांची डिलिव्हरी देण्यासाठी जातील तेव्हा ते धोनीसारख्या व्यक्तीला भेटतील.
दरम्यान धोनीची टीम चेन्नई यंदाच्या आयपीएल मध्ये चांगली खेळी दाखवू शकली नाही. धोनीच्या चेन्नई टीमला माध्यातूनच परतावे लागले. यंदाच्या आयपीएल या मध्ये धोनीच्या टीमला चांगलाच संघर्ष करावा लागत होता. २०२०चे हे आयपीएल वीजेपद मुंबईने पटकावले आहे. मागील वर्षी देखील मुंबईनेच विजेतेपत मिळवले होते.
महत्वाच्या बातम्या
- अर्णव गोस्वामींना जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? साळवे यांनी ठेवले खटक्यावर बोट
- सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेनेच विश्वासघात केला – फडणवीस
- ‘एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अहंकार किंवा अजेंड्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही’
- WHO : जागतिक स्तरावरील आणि सार्वभौमिक आरोग्य व्याप्तीमध्ये भारताच्या नेतृत्वाचे स्वागत!
- सर्वोच्च न्यायालयाच्या या तातडीच्या सुनावणीबाबत आश्चर्य : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
