Share

मोठी बातमी : रेमडेसिविरच्या ४.५ लाख कुप्या केंद्र सरकार करणार आयात

Published On: 

नवी दिल्ली- अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं इतर देशांकडून रेमडीसीवीर आयात करायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी 75 हजार वायलची पहिली खेप भारतात पोहोचली आहे.

सरकारच्या मालकीच्या एच.एल.एल लाइफ केयर लिमिटेड या कंपनीने अमेरिकेतील २ कंपन्यांकडून रेमडिसीवीरच्या 4 लाख 50 हजार वायल मागवल्या आहेत. देशांतर्गत 7 परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता दरमहा 38 लाख वायलवरून वाढून 1 कोटी 3 लाख वायल झाली आहे.

मे. गिलियड सायन्सेस इनकार्पोरेशन (अमेरिका), मे. इव्हा फार्मा (इजिप्त) यांच्याकडे ही मागणी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, आणखी एक लाख कुप्या १५ मेपर्यंत दाखल होत आहेत. इव्हाफार्मा कंपनी सुरुवातीला १० हजार कुप्या व नंतर ५० हजार कुप्या जुलैपर्यंत पाठवणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!