आहमदाबाद : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात पंजाबकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ख्रिस गेलने आरसीबीचा गोलंदाज काईल जेमिसन याने पॉवरप्लेच्या आखेरच्या षटकात ५ चौकार मारले. गेलने या षटकातील पहिल्या ४ चेंडूंवर सलग ४ चौकार मारले होते. तर पाचव्या चेंडूवर त्याला एकही धाव काढता आली नाही. मात्र अखेरच्या चेंडूवर पुन्हा चौकार ठोकला. त्यामुळे आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध एका षटकात ५ किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी शेन वॉटसनने २००८ साली आरसीबीविरुद्ध खेळताना प्रविण कुमारने गोलंदाजी केलेल्या एका षटकात ५ चौकार मारले होते. तर आयपीएल २०१२ च्या स्पर्धेत अजिंक्य रहाणेने आरसीबीविरुद्ध खेळताना अरविंदने गोलंदाजी केलेल्या एका षटकात सलग ६ चौकार मारले होते. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या गेलने केएल राहुलसह दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली. यादरम्यान त्याने २४ चेंडूत ४६ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले.
महत्वाच्या बातम्या
- नागरिकांना लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत मदत करा; पटोलेंचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन
- पंजाबकडून रवी बिश्नोईने घेतला पुन्हा एकदा नेत्रदीपक झेल; व्हिडीओ व्हायरल
- अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन
- ‘अद्यापही बहुतांश दुर्बल घटकांच्या बँक खात्यात जाहीर आर्थिक सहाय्यता निधी जमा झालेला नाही’
- ‘कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

