औरंगाबाद : शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यासाठीचे कायदे भाजपने केले. पण यासाठी केवळ भाजपच आग्रही होता असे नाही तर इतर पक्षांच्या जाहीरनाम्यातही त्याचा स्पष्ट उल्लेख होता. त्याचाही शोध घ्यावा, असे आवाहन भाजप नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले.
युवक बिरादरी, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र मुंबईतर्फे नुकतेच विधान भवनात अभिरूप युवा संसद स्पर्धा घेण्यात आली. त्यात एमजीएम वृत्तपत्रविद्या, जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाचपैकी चार पुरस्कार पटकावले. आशय येडगेने युवाभूषण पुरस्कार पटकावला. या सर्वांचा सत्कार सोहळा बागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नामदेवराव पवार, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्य प्रतापराव बोराडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य भाऊसाहेब राजळे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, एमजीएम वृत्तपत्रविद्या, जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी अभिरूप युवा संसद सादरीकरण झाले. त्यात शेतकरी आंदोलनाकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत. हाथरस प्रकरणात दुर्लक्ष झाले, असे मुद्दे मांडण्यात आले. तो संदर्भ देत बागडे म्हणाले की, २००६ ला कंत्राटी शेती कायदा महाराष्ट्रात लागू झाला. तोच केंद्रानेही केला. हे पत्रकारांनी सर्वांसमोर आणले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
- बार्शीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा अपेक्षाभंग तर अपक्ष आमदाराचा करिष्मा !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- ‘बाळासाहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असताना औरंगाबादचं संभाजीनगर होत नाही हे दुर्दैव आहे’
- ‘महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण खातं आणि मुख्यमंत्री यांच्यात कुठलाही समन्वय नाही


