Share

अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA ) नावाने फसवणूक

Published On: 

🕒 1 min read

पुणे : माणसाच्या आयुष्यात  कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. तसाच काहीसा प्रकार आज पुण्यात घडला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी आपली चांगली ओळख असून आपण पुणे महापालिकेतून ५ कोटींचे बजेट तुम्हाला मिळवून देतो अशी भोलवण करून एका व्यक्तीला १० लाख रुपयांना फसवल्याचा धक्कादायक  प्रकार आज समोर आला आहे.

या १० लाख रुपयांच्या फसवणूकी प्रकरणी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे शहरात वारजे परिसरात राहणारे महेश पटवर्धन यांनी  बंड गार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. महेश पटवर्धन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सातारा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या प्रवीण जगताप यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार पटवर्धन आणि आरोपी जगताप यांची मध्यंतरी कामानिमित्त भेट झाली होती. तेव्हा माझी अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी (PA) चांगली ओळख आहे. तुमचे कुठलेही काम असेल तर मला सांगा मी ते लगेच करून देतो असे जगताप यांनी पटवर्धन यांना सांगितले होते. पटवर्धन यांनी सुद्धा जगताप यांच्यावर विश्वास ठेवला होता. नंतर जगताप यांनी पटवर्धन यांच्याकडून पुणे महानगरपालिकेचे ५ कोटींचे काम मिळवून देतो असे सांगत १० लाख रुपये आधी घेतले. परंतु आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच महेश पटवर्धन  यांनी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सुद्धा त्वरित कार्यवाही करत सातारा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या प्रवीण जगताप यांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!