Share

तन्मय प्रकरणी अमृता फडणवीस मैदानात, म्हणाल्या..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतल्याने राजकीय वाद निर्माण केला जातोय. तन्मयने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा फोटो शेअर केल्याने हा वाद सुरू झालाय. यावरुन त्याच्यासह देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे. लसीकरणासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांच्या निकषामध्ये तन्मय मोडत नाही, मग त्याला लस कशी काय दिली? असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विचारलाय. देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही भाष्य केले आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तन्मय प्रकरणावरून ‘हा विशेषाधिकार असावा’, असा खोचक टोला फडणवीस यांना लगावला होता. यावर अमृता यांनी खा.चतुर्वेदी यांनी उत्तर दिलेय. ‘कोणत्याही सेवेची प्राथमिकता ही राजकीय शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणांच्या आधारावर असायला हवी. कोणीही नियम किंवा कायद्यापेक्षा मोठा नाही.

तन्मय प्रकरणात जे कायद्याच्या चौकटीत योग्य आहे ते व्हावे. आम्ही नेहमीच न्यायाच्या बाजून उभे आहोत. आम्ही या मुद्द्यावर आपल्यासोबत आहोत. कृपया याबद्दल योग्य ती कारवाई केली जावी, म्हणजे भविष्यात नियमाबाह्य पद्धतीने होणाऱ्या कृत्यांना आळा घालता येईल’, असे मत अमृता यांनी व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे नेहमी धारदार शब्दांत समोरच्यावर टीका करणाऱ्या अमृता यांनी मात्र आज सौम्य भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या मताचे अनेकांनी स्वागत केले आहे. त्यांची भाषा पाहून नेटकऱ्यांमधून त्यांचे कौतूक होतेय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!