🕒 1 min read
नागपूर : काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला होता. उद्धव ठाकरेंनी केलेले सर्व आरोप खोडून काढण्यासाठी भाजपा नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांचा अर्धा पक्ष उपऱ्यांच्या भरवशावर त्यांनी आम्हाला का सांगावे? काही उमेदवार तर त्यांना आम्हीच दिले. असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
ज्यांचा अर्धा पक्ष उपऱ्यांच्या भरवशावर त्यांनी आम्हाला का सांगावे? काही उमेदवार तर त्यांना आम्हीच दिले.
(माध्यमांशी संवाद । नागपूर । 16 ऑक्टोबर 2021)#Maharashtra pic.twitter.com/GVQyKtgKZp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021
संघराज्य व्यवस्था बदलण्याचे मनसुबे मुख्यमंत्री बोलून दाखवितात. म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा! काहीही झाले तरी हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही! असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सींच्या वापराच्या विरोधात आहे. कधीही ते एजन्सीचा गैरवापर करू देत नाहीत. एजन्सीच्या कामातही येत नाहीत. एजन्सीचा राजकीय वापर करू देत नाही. त्यांनी एजन्सीचा वापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं. असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
ईडी, सीबीआय. ती का येते? ती आम्ही नाही आणली. त्याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या सरकारचे नेतृत्व करत आहात ते भ्रष्ट सरकार आहे. इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. खंडणी उकळणं हाच या सरकारचा अजेंडा आहे, असा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला
- राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; दानवेंचा घणाघात
- ‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

