मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वारंवार ‘चंपा’ असा उल्लेख करण्यात येत आहे. नुकताच त्यांनी पंढरपुरात बोलताना पुन्हा एकदा पाटील यांचा उल्लेख चंपा असा करत खिल्ली उडवली. आता याच मुद्द्यावरून भाजपने जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
भाजपनेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या खोचक शब्दात टीका केली असून एक इशारा देखील दिला आहे. आम्ही अजित पवारांना मुत्र्या म्हणालो तर राष्ट्रवादी वाल्यांना ते आवडणार नाही, म्हणून अजित पवारांनी आमच्या नेत्यांबद्दल बोलताना विचार करून बोलावं, नाही तर सगळ्यांना माहीत आहे आम्ही काही बोलू शकतो असा इशारा त्यांनी अजित पवारांना दिला आहे.
आम्ही अजित पवारांना मुत्र्या म्हणालो तर राष्ट्रवादी वाल्यांना ते आवडणार नाही, म्हणून अजित पवारांनी आमच्या नेत्यांबद्दल बोलताना विचार करून बोलावं, नाही तर सगळ्यांना माहीत आहे आम्ही काही बोलू शकतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 15, 2021
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार यांनी बुधवारी पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टीकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी पंढरपूरच्या मतदारांना केले.
दरम्यान, या सर्व प्रकारावरून पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
- २४ तासांत माज उतरला! पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या जतीनने मागितली जाहीर माफी
- पत्नी सोबत वेळ घालवता यावा म्हणून अनुपम खेर यांनी अमेरिकन सीरिजला ठोकला रामराम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- ‘भाजपकडे 105 तर महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत; मग सत्तापरिवर्तन कसे होणार?’

