अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रवरा नदी दुधडी भरुन वाहू लागली. त्यामुळे प्रवरा नदीला मिळणाऱ्या ओढ्याचे पाणी उलट्या दिशेने नेवासा शहरातील मारुती नगर व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोड परिसरात असलेल्या रामकृष्णनगर चक्रनारायण वसाहत परिसरात घुसल्याने या भागातील नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढली. यामध्ये या भागातील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले असून घरात पाणी शिरल्याने दैनंदिन वापरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी रात्री मुळा धरणातून वीस हजार क्लूसेसने पाणी सोडण्यात आले. प्रवरा नदीत सोडण्यात आलेले पाणी व मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे मारूती नगर, रामकृष्ण नगर, चक्रनारायण वसाहत भागात असणारे ओढे ओव्हरफ्लो झाले. या भागात रात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक पाणी शिरले. यामुळे नागरिक भयभीत झाले. यात काहींनी अख्खी रात्र घराच्या छतावर जागून काढली. यावेळी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी धावून आली नाही.
शासनाने नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करावेत व आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. तसेच या भागात असलेल्या ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण
- महाराष्ट्राचे वीरपुत्र सचिन जाधव लडाखमध्ये शहीद!
- मराठा समाजाचे ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
- पवारांच्या भेटीनंतर शिवसेनेने भूमिका बदलली, शेतकरी विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी ?
- महाराष्ट्रात आंबेडकरवादी पक्षांनी स्वतःचं अधःपतन आणि हसू करून घेतलं – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

