🕒 1 min read
मुंबई : आगामी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. प्रत्येक संघातील खेळाडू हे विविध टी-२० लीग मध्ये खेळुन विश्वचषकाची तयारी करत आहे.
यादरम्यान दक्षिण अफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज फाफ डुप्लेसीसने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबत भाकीत व्यक्त केले आहे. डुप्लेसीसच्या मते आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पोहोचतील असे भाकीत व्यक्त केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की,’ वेस्ट इंडिज संघात तुफानी फटकेबाजी करणारे आणि अनुभवी फलंदाज आहेत. या खेळाडुंच्या प्रदर्शनाच्या जोरावर वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरु शकतो.’
तर यावेळी भारतीय फलंदाजाबाबत बोलताना तो म्हणाला की,’भारतीय संघात अनुभवी खेळाडू आहेत. या संघात वेगवान आणि फिरकी गोलंदाज आहे. या संघात निर्णायक अंतिम षटकात कशी गोलंदाजी करायची आणि याच षटकात फलंदाजी कशी करायची अशी जाण असणारे खेळाडू या संघात आहे. त्यामुळे हा संघ समतोल राखतो.’ भारतात आयोजीत टी-२० विश्वचषक हा कोरोना परिस्थीतीमुळे युएईमध्ये होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- महापौरांचा 100% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई – आशिष शेलार
- ‘स्वीगी’ने विचारलं, ‘जेवलीस का? पोरा-पोरींचे भन्नाट रिप्लाय वाचून हसून हसून व्हाल लोटपोट
- ‘आम्ही आकडे लपवलेले नाहीत,मात्र जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे’
- संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न
- मोदींच्या भेटीपूर्वी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये झाली तासभर चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
