चंदिगढ : हरयाणातील गुरुग्राममध्ये कुत्र्याचं नाव टॉमी असूनही शेजाऱ्याने कुत्रा म्हटल्यानं तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन कुटुंबात याझालेल्या हाणामारीमध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
हरयाणातील गुरुग्राममध्ये ही घटना घडली आहे. ज्योती पार्क मधील रहिवाशी असणारे सुधीर यांच्या शेजाऱ्याने कुत्रा पाळला होता. त्याने कुत्र्याचं नामकरण टॉमी केलं होतं. पाळलेला कुत्रा आक्रमक असल्याने आणि चावायला धावत असल्याने परिसरातील शेजारी त्रस्त झाले होते. त्यामुळे सुधीर यांनी त्या शेजाऱ्याला कुत्र्याला साखळीने बांधून ठेवण्याचा सल्ला दिला.
कुत्र्याला साखळीने बांधण्याच्या सुधीर यांनी दिलेल्या सल्ल्याचं कुत्र्याच्या मालकाला वाईट वाटलं नाही, तर त्याने कुत्रा म्हटल्यानं त्याला राग आला. टॉमीला कुत्रा म्हटल्याने कुत्र्याचा मालक संतप्त झाला आणि पुढे या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
टॉमीच्या मालकाच्या कुटुंबातील सर्वांनीच या शेजारच्या कुटुंबावर हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कुटुंबांची चौकशी करुन, दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- इच्छाशक्ती समोर कोरोनाही झुकतो; डॉक्टरांनीही आशा सोडलेल्या ९३ वर्षीय आजोबांनी जिंकून दाखवलं !
- दु:खद! मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन यांचे निधन, महिन्याभरापुर्वीच झाले होते कोरोनामुक्त
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला
- एबी डिव्हीलीयर्स नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडूही टी-२० विश्वचषकात करु शकतो पुनरागमन
- …तर ३ आठवड्यात मुंबईकरांचे लसीकरण करू ; आदित्य ठाकरेंचा दावा


