🕒 1 min read
मुंबई : हॉकीचे जादुगर म्हणुन प्रसिद्ध असलेले मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन सिंह यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे एक महिन्यापु्र्वीच त्यानी कोरोनावर मात केली होती. बृजमोहन हे ८२ वर्षाचे होते.
मेजर ध्यानचंद याच्या सात मुलापैकी बृजमोहन हे सर्वात जेष्ठ होते. त्याच्या निधनाबद्दल त्यांचे भाऊ अशोक कुमार यांनी माहिती दिली आहे. अशोक कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनातून सावरल्यानंतर बृजमोहन हे पुर्णपणे बरे होते. मृ्त्युपुर्वी त्यांनी एक दिवस आधी रात्री एक इंग्रजी चित्रपट बघितला होता. यानंतर सकाळी मॉर्निंग वॉक करुन घरी परत आले. घरी आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे ज्युस प्राशन केला. यानंतर ते बाथरुममध्ये गेले आणि तिथेच त्यांचा मृत्यु झाला.
महत्वाची बाब म्हणजे २ दिवसापुर्वी म्हणजे शनिवारी भारताने दोन हॉकीपटु गमावले होते. माजी हॉकीपटू एमके कौशिक यांचे कोरोनामुळे ६६व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले होते. तर एम के कौशिक यांनी दिल्ली येथील रुग्णायलात आखेरचा श्वास घेतला. तर आता मेजर ध्यानचंद यांचा मुलगा बृजमोहन यांचे निधन झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला
- एबी डिव्हीलीयर्स नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडूही टी-२० विश्वचषकात करु शकतो पुनरागमन
- ‘या’ तालुक्यात सर्वात कमी लसीकरण; मृत्युदरही जास्त!
- ‘या’ महान गोलंदाजाला आवडते हॉलिवूड अभिनेत्री ; मैत्री वाढवण्याच्या आहे प्रयत्नात
- जालन्यातील लोधी मोहल्ला भागात तुफान दगडफेक; दोन पोलीस कर्मचारी जखमी


