Share

खडसेंची ‘ती’ ऑडिओ क्लिप लिक झाल्याचं समजलं, मात्र… शिवसेना नेत्याचा खडसेंना सल्ला

Published On: 

मुंबई : एकेकाळचे भाजपचे दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ खडसेंनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला असून खडसेंनी आता भाजपच्या नेत्यांवरच प्रहार करण्यास सुरुवात केली आहे.

एकनाथ खडसे यांचा एक कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत असून यात त्यांनी भाजप आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खालच्या भाषेत टिपण्णी केली आहे. तर, गिरीशने महाजन यांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, राज्यातील सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा टीका-टिपण्णी करणे योग्य नसल्याचा सल्ला शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

‘एकनाथ खडसे यांची ऑडिओ क्लीप लिक झाल्याचं मला आत्ताच समजलं. या दोघांचं युद्ध नेहमीच सुरु असतं. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. तसेच आपल्या जळगाव जिल्ह्याला कोरोनापासून दूर कसं ठेवता येईल, हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे सध्यातरी अशा गोष्टींपासून दूर राहायलं हवं,’ असं भाष्य गुलाबराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे ?

वडगाव बुद्रुक तालुका जामनेर मधील एका व्यक्तीने गावातील गंभीर पाणी प्रश्नासंदर्भात खडसेंना मदतीसाठी फोन केला होता. यावेळी, खडसेंनी या व्यक्तीला गावाचे व तालुक्याचे नाव विचारले असता ‘पाणी नाही, तर तुझा आमदार कुठे मेला?’ असा सवाल या ग्रामस्थाला केला. यावर त्याने ते फोन उचलत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं. यावर, ‘पोरीचा फोन उचलतो तो फक्त’ असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.

पुढे त्यांनी या ग्रामस्थाची तक्रार एकूण गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचे आश्वासन देखील दिले. मात्र, जामनेर मतदारससंघाचे आमदार भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन हे असून त्यांच्याबद्दल खडसेंनी केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. याआधी देखील महाजन आणि खडसेंमधील वाद अनेकदा उफाळून आल्याचं समोर आलं होतं. आता खडसेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!