Share

गुजरातच्या गोध्रा कांडाप्रमाणे पुलवामाचा कट, गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: गुजरातच्या गोध्रा कांडाप्रमाणे पुलवामाचा कट आखण्यात आला होता. त्यामुळे पुलवामाचा दहशतवादी हल्ला भाजपचाच कट असल्याचा गंभीर आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. भाजप लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दहशतवादाचा वापर करत आहे, असा आरोपही वाघेला यांनी केला आहे.

सरकारकडे बालाकोट येथे दहशतवादी तळ असल्याची माहिती होती, मग पुलवामा हल्ल्याची वाट का पहिली. बाळकोटमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राईक हा पूर्व नियोजित होता, ज्यामध्ये कोणीही ठार झाले नसल्याचं वाघेला म्हणाले.

गुजरातमधील भाजप नेत्यांमध्ये ते मजूर असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गुजरातचे नेते भाजपवर नाराज असल्याचं वाघेला यांनी सांगितले आहे. शंकरसिंह वाघेला यांनी भाजप, काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!