लातूर : जिल्हात शनिवारी रात्रीपासून दमदार पाऊस पडला असून ११ महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दिर्घकाळाच्या विश्रातीनंतर पडलेल्या पावसाने जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. तथापी यामध्ये लातूर, रेणापूर व देवणी तालुक्यासह जिल्हाभरातील काही भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात माहिती मिळताच झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या दोन तीन दिवसापासून लातूर जिल्हामध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी लातूर, रेणापूर, देवणी तालुक्यासह जिल्हाभरातील सर्वच तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील सर्व महसुल मंडळात गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा मोठया प्रमाणात पाऊस पडला आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व लातूर ग्रामिणचे आमदार धिरज देशमुख यांनी पावसामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच प्रशासनाला सदरील नुकसानीची भेट देऊन पाहणी करावी, या नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करावा असे आदेश दिले.
जिल्हा प्रशासनाला पाहणीचे आदेश मिळताच लातुर तालुक्यातील गंगापूर व रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, दर्जीबोरगाव, गव्हाण, ब्रम्हवाडी, आंदलगाव येथील नुकसान झालेल्या ऊसासह खरीप पिकांची संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्या तोच भगवा मुंबई महापालिकेवर फडकणारच’; नितेश राणेंचा विश्वास
- महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली; पुण्यात १४ वर्षीय मुलीवर आठ नराधमांनी केला बलात्कार
- दिलासादायक : कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘या’ औषधाच्या वापराला मंजुरी\
- मिलिंद सोमणची रुग्णालयातील पोस्ट पाहून नेटकरी संतापले
- ‘एक अजनबी हसीना से…’; शशी थरूर यांच्या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

