Share

‘धनु भाऊ आता तुम्हीच आमचे माय बाप’ म्हणत पीडितांनी फोडला टाहो…

Published On: 

अंबेजोगाई : बीड जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल असे मुंडे म्हणाले. तसेच सदर प्रकरणातील दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करावे अशा सूचना ना. मुंडेंनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी मुंडे यांच्यासह आमदार संजय दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बहुजन मुक्ती मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मानवी हक्क अभियानचे मिलिंद आव्हाड, अजय मुंडे , शिवाजी शिरसाट, दत्ताआबा पाटील यांसह अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांसह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

धनंजय मुंडे पवार कुटुंबाच्या पालावर जाताच पवार कुटुंबियांनी ‘धनु भाऊ, आता तुम्हीच आमचे माय बाप आहात, आम्हाला न्याय द्या…’ असे म्हणत टाहो फोडला. यावेळी मुंडे यांनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळून 100 % न्याय मिळेल अशी खात्री दिली.

रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्यावरही केलं भाष्य म्हणाले…

अंबेजोगाई येथे पालावर राहणाऱ्या पवार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ना. मुंडे यांनी किमान तीन महिने पुरेल इतके अन्न धान्य पवार कुटुंबियांना देण्याबाबत स्थानिक तहसीलदारांना आदेशित केले आहे. तसेच विभागामार्फत घरकुल योनेतून घरासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे मुंडे म्हणाले.

दरम्यान सामाजिक न्याय विभागामार्फत हत्या झालेल्या तीनही व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख १२ हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली आहे. तसेच योजनेनुसार उर्वरित ४ लाख १२ हजार रुपये रक्कम दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देण्यात येईल, त्याचबरोर पीडितांच्या लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही शासन गेली असे मुंडे म्हणाले.

विधानपरिषद निवडणूक : भाजपच्या उमेदवाराने गुन्ह्य़ाची माहिती लपवली ? प्रतिज्ञापत्रावरून नवे वादळ

पवार कुटुंबीयांनी मुंडे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या, यावेळी हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाले असल्याचा संशय असल्याने पवार कुटुंबाने आपल्याला आणखी धोका होऊ नये म्हणून इतरत्र जमीन मिळवून देण्याबाबत मुंडे यांना विनंती केली. मुंडे यांनी पवार कुटुंबियांना इतरत्र जमीन मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान पवार कुटुंबियांच्या पालावरून मुंडे यांनी या घटनेतील जखमी महिलेची स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्यासह उपचार करत असलेल्या डॉक्टरांना आवश्यक सूचना केल्या. तसेच दवाखाना व परिसरात पोलीस बंदोबस्त व सुरक्षेबाबतही पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.

#मजुरांचे_हाल : ही पण आपलीच माणसं आहेत, भाजप खासदाराचे गृहमंत्री अमित शहांना पत्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!