Share

रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्यावरही केलं भाष्य म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या आणि आमदार झालेल्या रणजीतसिंह मोहिते पाटील यांना आता विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं आहे. नुकतेच त्यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “आमच्या विकासांच्या मुद्यांना राजकीय वळण दिलं गेलं. माझे अजित पवार किंवा इतर कोणाशीही वैयक्तिक वाद नाहीत, काही विषयावरुन मतभेदामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडलो,’ असे वृत्त न्युज १८ लोकमतने दिले आहे.

‘आमच्या विकासांच्या मुद्यांना राजकीय वळण दिलं गेलं. आमचा कोणाशीही वैयक्तिक वाद नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ते काम करेल . शरद पवारांबाबत जी पक्षाची भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल. पाणी या विषयावर प्रामुख्यानं काम करायचं आहे. माझे अजित पवार किंवा इतर कोणाशीही वैयक्तिक वाद नाहीत, काही विषयावरुन मतभेदामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडलो,’ असं रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

खडसेंच्या नाराजीवर ते म्हणाले, कोणत्याही राजकीय नेत्याची कागदपत्रं कायम तयार असतात. माझ्या उमेदवारीमुळे कोणी नाराज असेल तर याबद्दल किंवा त्यांच्याऐवजी मला उमेदवारी का दिली हे मी सांगू शकणार नाही, हा पूर्णपणे पक्षाचा निर्णय आहे,’

‘मी भाजपात प्रवेश करताना अटी-शर्ती घातल्या नव्हत्या. मला शेवटच्या टप्प्यात उमेदवारीचं सांगण्यात आलं. कृष्णा भीमा स्थिरीकरणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे, पाण्याच्या विषयामुळे वाद झाला. विजयसिंह मोहितांना विरोध केला गेला. आम्ही पुढील अधिवेशनाच्या वेळी हा मुद्दा आणणार आहोत, त्यावेळेस कोण विरोध करतंय ते सगळ्यांना कळेलच,’ असं म्हणत रणजीतसिंह यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!