🕒 1 min read
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबई येथील जे. जे . रुग्णालयात कोरानाचा पहिला डोस घेतली आहे. नांदेडच्या नागरिकांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन देखील या वेळी चव्हाण यांनी केले.
नांदेडकरांनो कोरानाचा वाढता संसर्ग थांबावयाचा असल्यास प्रशासनाने केलेले सर्व नियम तसेच आदेशाचे पालन करावे. तसेच कोरानाच्या लसीबाबत कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. कोरानाची लस ही पुर्णपणे सुरक्षित आहे. तसेच नांदेडमधील नागरिकांनी जिल्हाप्रशासनाने सांगितले आहे की, मास्क वापरावे, हात स्वच्छ धुवावेत, सॅनेटायझरचा वापर करावा, तसेच सोशल डिस्टंसिंग तसेच विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. या सह दिलेल्या सर्व सुचनांचे पालन काटेकोरपणे करुन प्रशासनास सहकार्य करावे असेही या वेळी आवाहन करण्यात आले.
नांदेड शहरासह जिल्हाभरात कोराना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. ४५ वर्षांच्या वरचे तसेच गंभीर आजार असलेल्या नागरिकांना ही लस देण्यात येत आहे. तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ही लस नक्की घ्यावी. ही लस सरकारी रुग्णालयामध्ये मोफत देण्यात येत आहे. तर खासगी रुग्णालयामध्ये २५० रुपयांचे शुल्क आकारण्यात आले आहे. दरम्यान आमदार मोहन हंबर्डे यांनी देखील कोरोनाची लस घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


