Share

‘शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख’ ; राजीव सातव यांच्या निधनानंतर रितेश देशमुखची भावूक पोस्ट

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. पण दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचंच वृत्त काँग्रेसकडून देण्यात आलं. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अभिनेता रितेश देशमुख यांनीही ट्विट करुन ही धक्कादायक घटना असल्याचं म्हटलंय. सातव यांच्या निधनानंतर ट्विटरवर दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. ‘राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. या घटनेनं मला अतिशय दु:ख झालं असून ते शब्दात व्यक्तही करता येणार नाही. सातव यांचं नेतृत्व तरुण आणि स्फोटक होतं, मोठं राजकीय करिअर त्यांच्यासमोर उभा होतं. त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली… त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याच ताकद मिळो,’ असे ट्विट रितेश देशमुख यांनी केलंय.

सातव यांच्या अचानक जाण्यामुळे राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून काँग्रेसमधील भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!