🕒 1 min read
मुंबई: देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांचा आज जन्मदिवस असून या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्वीट करत अभिवादन केले आहे.
‘आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रहितासाठी झटणारे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा परिवारातील अग्रणी श्री अरुण जेटली जी यांची आज जयंती. भारताच्या विकासासाठी त्यांनी दिलेले बहुमूल्य योगदान भारत कधीच विसरू शकत नाही. या समर्पित, निष्ठावंत व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन!’ असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रहितासाठी झटणारे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा परिवारातील अग्रणी श्री अरुण जेटली जी यांची आज जयंती. भारताच्या विकासासाठी त्यांनी दिलेले बहुमूल्य योगदान भारत कधीच विसरू शकत नाही. या समर्पित, निष्ठावंत व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/rMbW4ZDy6B
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 28, 2021
तसेच राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही ट्वीट करत अरुण जेटली (Arun Jaitley) यांच्या कार्याला उजाळा देत अभिवाद केले आहे.‘आपल्या युक्तिवाद पूर्ण वक्तृत्वाने भल्याभल्यांना गारद करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजकीय प्रवासास विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात झाली होती. जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवतानाच आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला होता. विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, कायदा मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द प्रचंड गाजली होती.अरुणजी जेटली यांना विनम्र अभिवादन!’ असे ट्वीट छगन भुजबळ यांनी केले आहे.
दरम्यान १९९१ पासून अरुण जेटली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. तसेच १९९९मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला. तसेच २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- “‘ही’ परिस्थिती सरकारच्या नाकर्तेपणाची व महाराष्ट्राच्या दुर्देवाची साक्ष देते”
- देशाचा स्वातंत्र्यलढा, लोकशाहीची स्थापना व राष्ट्र उभारणीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान-अशोक चव्हाण
- आयपीएलच्या पुढील हंगामात ‘हे’ खेळाडू असणार 10 संघांचे कर्णधार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

