Share

मराठवाड्यातील तरुणांना मोठा दिलासा! एनडीएचे पहिल्यांदाच औरंगाबादेत परीक्षा केंद्र

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीसाठी (एनडीए) घेण्यात येणारी प्रवेशपूर्व परीक्षा १४ नोव्हेंबर हाेणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात परीक्षा केंद्र मिळाल्याने मराठवाड्यातील तरुणांची माेठी साेय झाली आहे. परीक्षेचे अर्ज दाखल करण्याची मुदत २९ जून आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ७५ परीक्षा केंद्रे वाढवली आहेत. महाराष्ट्रात चार शहरात नवीन परीक्षा केंद्रे घोषित केली आहेत.

यापूर्वी मुंबई आणि नागपूर येेथे परीक्षा देण्याची सोय होती. देशभरातून या परीक्षेला सहा लाखांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. पुणे, खडकवासला आणि नेव्हल अकादमीसाठी वर्षातून दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोग लेखी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेते. प्रथम लेखी परीक्षा व त्यानंतर पाच दिवसांचा मुलाखत व शारीरिक चाचणीचा कार्यक्रम असतो. यातून साडेतीनशे यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीत तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. कोरोनामुळे सर्वच परीक्षांवर परिणाम झाले आहे.

यावर्षीची पहिली प्रवेशपूर्व परीक्षा १८ एप्रिल रोजी पार पडली. दुसरी परीक्षा ५ सप्टेंबरला हाेणार हाेती. मात्र, बारावी परीक्षेचे निकाल अद्याप लागलेले नसल्यामुळे परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. राज्यात मुंबई, नागपूरसह अाता नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबादला परीक्षा केंद्र असेल. पूर्वी औरंगाबाद शहरातील राज्य शासनाच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा नागपूरला न्यावे लागत होते. संस्थेने भारतीय सैन्याला सहाशेवर अधिकारी दिले असून यापैकी १२० फायटर पायलट आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!