Share

अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक नाही

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी परब यांच्या तक्रारीवरुन भाजप आमदार नितेश राणेंसह (Nitesh Rane) भाजप पदाधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार होती. अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने काही दिवसांपासून नितेश राणे अज्ञातवासात होते. मात्र आता त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. आता अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्याने ते अज्ञातवासातून बाहेर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई करणार नाही, अशी ग्वाही न्यायालयात दिली. त्यामुळे नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल. यावेळी पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाईल. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अटकेच्या भीतीने नितेश राणे तब्बल आठवडाभरापासून अज्ञातवासात आहेत.

न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी बाजू मांडली. मात्र, अर्जाला प्रतिज्ञापत्रावर सविस्तर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर तोपर्यंत पोलिसांनी नितेश राणे व संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे म्हणणे प्रधान यांनी मांडले. तेव्हा पुढील सुनावणीपर्यंत पोलिसांकडून कठोर कारवाई होणार नाही, अशी हमी सरकारी वकिलांनी दिली आहे. यामुळे नितेश राणेंसह भाजप कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!