मुंबई : आज जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज जगभरात महिला दिनाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर केला जात आहे. दरम्यान, कुर्ला परिसरात राहणाऱ्या या आजीबाईंनी कोरोना लस घेतल्यानंतर लशीकरण केंद्रावरच कर्मचाऱ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या जगभरात कोरोनाच्या लसीकरण सुरुवात झाली आहे. मात्र लसीकरणाच्या कमतरतेमुळे आधी वृद्ध लोकांना प्राधान्य दिलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात अनेक वृद्ध लोकांना कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. मुंबईतील एका आजीबाईंनी सुद्धा ही लस टोचून घेतली आहे. मात्र याचं वैशिष्ट्य हे आहे की लशीकरण्याच्या दिवशीच आजीबाईंनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली. त्यांचा 100 व वाढदिवस होता.
#WATCH | A 100-year-old woman received COVID-19 vaccine and celebrated her birthday with healthcare workers at BKC Jumbo vaccination centre in Mumbai yesterday. pic.twitter.com/ngwQEA7UWG
— ANI (@ANI) March 6, 2021
रिपोर्टरच्या माहितीनुसार या 100 वर्षांच्या आजीबाईंनचं नाव ‘प्रभावती खेडकर’ असं आहे. मुंबईच्या अंधेरी भागात त्या राहतात. त्या लशीकरणासाठी आल्या असता. त्यांच्या लशीकरण कार्डवर 5 मार्च 1921 अशी जन्मतारीख होती. ते पाहतच केंद्रावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी लगेच केक मागवून त्यांचा वाढदिवस साजरा केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोविड सेंटरमध्ये रूम देण्याच्या कारणावरून रुग्णांची नोडल अधिकाऱ्यांना मारहाण
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा “हा” व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल


