Share

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दुसऱ्या टप्प्यात लस !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण अभियान हाती घेण्यात आले. कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना लस देण्यात येणार आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार त्यामुळे पंतप्रधान दुसऱ्या टप्प्यात लस घेणार आहेत.

कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील ७५ टक्के खासदारांना कोरोना लस देण्यात येणार आहे. याच टप्प्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

लोकसभेचे ३४३ सदस्य आणि राज्यसभेचे २०० सदस्य ५० वर्षांवरील वयोगटातील आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील ९५ टक्के मंत्र्यांना कोरोना लस देण्यात येऊ शकेल. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होताच लोकसभेपासून विविध राज्यातील विधानसभेपर्यंत कोरोना लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. कोरोना लसीकरणाच्या पुढील टप्प्यांमध्ये लोकप्रतिनिधींना लस न देण्यावर बराच विचार-विनिमय करण्यात आला. यानंतरच हा निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!