लातूर : घरकुलाचा हप्ता बँकेच्या खात्यावर टाकण्यासाठी लाभार्थ्याकडून लाच घेताना एसीबी पथकाने कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे. निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथे एबीसीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लाभर्थ्याला ग्रामसेवकाने दोन हजाराची लाच मागितली होती.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार गरजु व्यक्तिसाठी विविध योजना राबवत असते. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे एक व्यक्ती सरकारच्या घरकुल योजनेचा लाभार्थी होता. लाभार्थीच्या घरकामाचा तिसरा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी ग्रामसेवक वैजीनाथ मोहन चात्रे यांनी दोन हजार रुपयाची लाच मागितली होती. याबद्दल लाभार्थ्याने संबधीत विभागाकडे तक्रार केली होती.
दरम्यान, तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी अंबुलगा येथे सापळा रचून ग्रामसेवक वैजीनाथ मोहन चात्रे यांचा सेवक दत्ता सुर्यवंशी यला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. याबाबत औराद शहाजानी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक मणिक बेंद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे आणि बाबासाहेब काकडे, संजय पस्तापुरे, रमाकांत चाटे, लक्ष्मिकांत देशमुख, चंद्राकांत डांगे, मोहन सुरवसे, शिवकांता शेळके सहकारी करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वसीम जाफर वादात आता राहुल गांधींनी घेतली उडी
- तक्रार करणारे तिचे नातेवाईक असले पाहिजेत, पूजा चव्हाण प्रकरणात वडेट्टीवारांचे अजब वक्तव्य
- नॉट रिचेबल मंत्री संजय राठोडांना माध्यामांशी न बोलण्याचे आदेश
- शरद पवार हे दिलदार राजकारणी, सुशीलकुमार शिंदेंनी उधळली स्तुतिसुमने
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
