🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांनी नुकतेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंडमध्ये झालेल्या वादानंतर वासिम जाफर यांनी हे पाऊल उचलले. वसीम जाफर यांच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. वासिम जाफर यांनी बुधवारी त्यांच्यावरील हा आरोप फेटाळून लगावले.
पण यावरून वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये. या वादामध्ये आता काँग्रेस नेते राहुल गांधींनी उडी घेतली आहे. मागच्या काही वर्षात द्वेष इतका सामान्य झाला आहे, की आता आपलं आवडतं क्रिकेटही यात अडकलं आहे, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. तसंच भारत आपल्या सगळ्यांचा आहे, त्यांना आपली एकात्मता भंग करून देऊ नका, असं आवाहनही राहुल गांधींनी केलं आहे.
In the last few years, hate has been normalised so much that even our beloved sport cricket has been marred by it.
India belongs to all of us.
Do not let them dismantle our unity.— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 13, 2021
दरम्यान, वसीम जाफरवर आरोप झाल्यानंतर अनिल कुंबळे, इरफान पठाण, मनोज तिवारी आणि मुंबईचे माजी क्रिकेटपटू शिशीर हट्टंगडी यांनी वसीम जाफरला पाठिंबा दिला आहे. माहिम वर्मा यांनी मीडियाच्या माध्यमातून, मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे, असे वासिम जाफर यांनी सांगितले.“संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे” असे वासिम जाफर पत्रकार परिषदेत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार हे दिलदार राजकारणी, सुशीलकुमार शिंदेंनी उधळली स्तुतिसुमने
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- गडकरीची औरंगाबादकरासाठी मोठी घोषणा; औरंगाबाद-पुणे महामार्ग होणार डायरेक्ट अॅक्सेस
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
