🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती, परंतु रविवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली. ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं ? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं, या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
या प्रकरणाशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाल्या असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हटलं की, पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एवढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय असा सवालही त्यांनी विचारला आहे.
यावर आता सरकारमधील मंत्र्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात अजब विधान केलं आहे. ज्यांच्या घरातील व्यक्ती आत्महत्या करते त्यांना चिंता असते. इतरांनी चिंता करण्याची गरज नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी चर्चा करताना हे विधान केलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणी कुणी तरी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. तक्रार करणारे हे तिचे नातेवाईक असले पाहिजेत. तिचं शोषण झालं की नाही? नेमकं काय झालं? हा काय प्रकार आहे? एकूण घटनेचं गांभीर्य काय आहे? हे पाहिलं पाहिजे. तसेच ज्या घरातील व्यक्ती किंवा कुटुंबाीतील व्यक्ती आत्महत्या करते. त्या घरातील व्यक्तीला चिंता असते. इतरांना चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार हे दिलदार राजकारणी, सुशीलकुमार शिंदेंनी उधळली स्तुतिसुमने
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- गडकरीची औरंगाबादकरासाठी मोठी घोषणा; औरंगाबाद-पुणे महामार्ग होणार डायरेक्ट अॅक्सेस
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
