हिवरेबाजार : गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षामध्ये कोण सरस ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे
हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे.हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे.
हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. दरम्यान,आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये विरोधकांचे बंड फुसका बार ठरले आहे.
कमी मते मिळाल्याने सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार अशी चिन्हे दिसत आहेत. तीस वर्षांनंतर निवडणूक होऊनही ग्रामस्थांचा पवार यांच्यावरील विश्वास कायम असल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला ‘सेक्युलरीजम’ शिकवण्याची काहीच गरज नाही, यशोमती ठाकुरांचे सेनेला प्रत्युत्तर
- धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे; ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप
- उस्मानाबादच्या १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला लवकरच मंजुरी
- आंदोलनाची पुढील रणनीतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची तातडीची बैठक
- कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार!


